Lyrics

मी चंचल होऊन आले मी चंचल होऊन आले भरतीच्या लाटापरी उधळीत भरतीच्या लाटापरी उधळीत जीवन स्वैर निघाले मी चंचल होऊन आले मी चंचल होऊन आले फुलवुनी गात्री इंद्रधनुष्ये क्षितिज विंधुनी धुंद कटाक्षे फुलवुनी गात्री इंद्रधनुष्ये क्षितिज विंधुनी धुंद कटाक्षे विरघळलेले... विरघळलेले नवथर उन्मद चंद्रकिरण मी प्याले मी चंचल होऊन आले मी चंचल होऊन आले श्रावणाचिया अधरी लपुनी श्रावणाचिया अधरी लपुनी रिमझिमणाऱ्या धारामधुनी श्रावणाचिया अधरी लपुनी रिमझिमणाऱ्या धारामधुनी पानावरचे पुसून आसू उर्वशीत मी हसले मी चंचल होऊन आले मी चंचल होऊन आले भरतीच्या लाटापरी उधळीत भरतीच्या लाटापरी उधळीत जीवन स्वैर निघाले मी चंचल होऊन आले मी चंचल होऊन आले नजराणे घेऊन ऋतूंचे हृदयातील गंधित हेतूंचे नजराणे घेऊन ऋतूंचे हृदयातील गंधित हेतूंचे आकाशाची प्रिया कधी मी होऊनी लाजत सजले मी चंचल होऊन आले मी चंचल होऊन आले जन्म-मृत्युचे लंघुनी कुंपण जन्म-मृत्युचे लंघुनी कुंपण स्थलकालाच्या अतीत उमलुन स्थलकालाच्या अतीत उमलुन प्रवासिनी मी... प्रवासिनी मी चिरकालाची अनाघ्रात ही उरले मी चंचल होऊन आले मी चंचल होऊन आले भरतीच्या लाटापरी उधळीत भरतीच्या लाटापरी उधळीत जीवन स्वैर निघाले मी चंचल होऊन आले मी चंचल होऊन आले
Writer(s): Mangesh Padgaokar, Shrinivas Khale Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out