Lyrics

फूल ते संपले, गंध ना राहिला फूल ते संपले, गंध ना राहिला हाक तू ऐकिली, साद नाही दिला फूल ते संपले, गंध ना राहिला मार्ग माझा आता चालतो एकला मार्ग माझा आता चालतो एकला मी न कोणी इथे, नाही मी येथला शून्य काळोख हा अंतरी साहिला फूल ते संपले, गंध ना राहिला सोसुनी वेदना गीत गातो कुणी सोसुनी वेदना गीत गातो कुणी लेखुनी क्षुद्रता आणि जातो कुणी मी ही जागेपणी खेळ हा पाहिला फूल ते संपले, गंध ना राहिला भेट झाली तिची याद ठेवू नये भेट झाली तिची याद ठेवू नये आणि स्वप्नामध्ये भेट घेऊ नये तू सुखी हो तिथे शाप माझा मला फूल ते संपले, गंध ना राहिला
Writer(s): Mangesh Padgaokar, Shrinivas Khale Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out